हुश्श…पुण्यातील करोना मृत्यूसंख्या अखेर एक आकडी

दिवसात 217 नवे बाधित : 259 जणांना डिस्चार्ज

पुणे – करोनामुळे दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या मागील चार महिन्यांपासून दररोजी तब्बल 60-65 पर्यंत पोहचली होती. महिन्याभरात ही संख्या 20 ते 25 पर्यंतखाली असून, दोन आकडी संख्या असलेली मृत्यू संख्या आज एक आकडी झाली आहे. गेल्या 24 तासांत करोनामुळे 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शहरात रविवारी नव्याने 217 करोना बाधित सापडले.

 

पुण्यात करोना बाधितांची संख्या आटोक्यात असली तरी सणा-सुदीमुळे शहरात वाढती गर्दी पाहता हा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यातच तज्ज्ञांकडून पुण्यासह राज्यात करोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसांपासून शहरासह उपनगरात खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता नागरिक करोनाला विसरले की काय? असे चित्र आहे.

 

रविवारी दिवसभरात 259 जण करोनामुक्त झाले. बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून सक्रीय बाधितांची संख्या पाच हजारांच्या जवळपास असून, ती कमी होत नाही. सध्या 5 हजार 146 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 396 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 260 बाधित व्हेंटिलेटरवर तर 136 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. 1,154 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.