पुणे- पुण्यात कोरोनाची लागण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोने पुण्यात पुन्हा दोन बळी घेतले आहे. बारामतीत आढळलेल्या कोरोना रुग्णाचे ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पहाटेच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
पुण्यात कोरोनाच्या मृतांचा आकडा 20 वर गेला आहे त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, पुण्यात काही हॉटस्पॉट भागात कर्फ्यु लावण्यात आला आहे आणि काही भाग सील ही करण्यात आला आहे.