Corona : कोविड-19 चा वापर जैविक शस्त्र म्हणूनच; अमेरिकेतील कागदपत्रात उल्लेख

वॉशिंग्टन – संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढा देत असताना या साथीच्या प्रसाराबाबत चीनच्या भूमिकेविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. चीनमध्ये कोविड 19 चा वापर शस्त्र म्हणून केली गेली असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडील कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे.

तिसरे युद्ध पूर्णपणे जैविक शस्त्राने केले जाईल असे चिनी कमांडर्सनी भाकीत केल्याचे या कागदपत्रात म्हटले आहे. शत्रूची वैद्यकीय व्यवस्था नष्ट होईल अशी जैविक शस्त्रे बनविण्याची योजना चिनी सैन्याने तयार केली होती असेही त्यात सांगण्यात आले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांना मिळालेल्या कागदपत्रानुसार चिनी सैन्यातील शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी 2015 मध्ये ही योजना तयार केली होती, असेही या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.