#Corona : माण तालुक्यात करोनाचे ‘अर्धशतक’

एका दिवसात 54 बाधित; दहिवडी हाॅटस्पाॅट

सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी माण तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 54 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एकट्या दहिवडी शहरात 45 रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून शहरात येणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. 

दहिवडीतील कोरोनाची साखळी तुटता तुटेनासी झाली आहे. त्यामुळे प्रशासन अक्षरश: हतबल झाले आहे. गत चार दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. माण तालुक्यातील पिंगळी व कुळकजाई या दोन गावात प्रत्येकी एक रुग्ण तर आंधळी दोन, खुटबाव या गावात पाच जण सापडले आहेत. तर दहिवडी शहरात तब्बल 45 रुग्ण सापडले आहेत. 

प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी, डीवायएसपी डाॅ. निलेश देशमुख हे दहिवडीत तळ ठोकून आहेत. शहरात येणारे सगळे रस्ते प्रशासनाकडून बंद करण्यात आले असून केवळ दहिवडी शहरातून खांडसरी चौकातून बाहेर पडता येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.