पुण्यात कोरोना नियंत्रण आढावा बैठक सुरु ; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

पुणे- राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यातच शहरात करोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज पुण्यात कोरोना नियंत्रण आढावा बैठक सुरु आहे.

उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल मध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीस कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पशुसंवर्धन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.