नवी दिली : देशातील करोना आणि वाढत्या ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून आता वेगाने उपाययोजना आखण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यातच आज
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी कोरबीव्हॅक्स आणि कोव्होव्हॅक्स लस आणि अँटी-व्हायरल औषध मोल्नुपिरावीरला मान्यता दिली आहे.
Congratulations India 🇮🇳
Further strengthening the fight against COVID-19, CDSCO, @MoHFW_INDIA has given 3 approvals in a single day for:
– CORBEVAX vaccine
– COVOVAX vaccine
– Anti-viral drug MolnupiravirFor restricted use in emergency situation. (1/5)
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 28, 2021
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्होव्हॅक्स या करोना लशीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली होती. त्यामुळे आता करोनाविरोधातील लढाईत आणखी दोन लशींची आणि एका औषधाची भर पडली आहे.
याविषयी ट्विट करत मांडविया म्हणाले, “कोरबीव्हॅक्स लस ही कोविड १९ विरुद्ध भारतातील पहिली स्वदेशी विकसित आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे, जी हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ई कंपनीने बनवली आहे.”
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या विषय तज्ञ समितीने (एसईसी) सीरमद्वारे कोव्होव्हॅक्स आणि बायोलॉजीकल ई द्वारे कोरबीव्हॅक्स या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरीची शिफारस केली आहे. अँटी-व्हायरल कोविड गोळी मोल्नुपिरावीरची देखील भारतात मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
Molnupiravir, an antiviral drug, will now be manufactured in the country by 13 companies for restricted use under emergency situation for treatment of adult patients with COVID-19 and who have high risk of progression of the disease. (4/5)
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 28, 2021
PM @NarendraModi Ji has led the battle against #COVID19 from the front. All these approvals will further strengthen the global fight against the pandemic.
Our Pharma Industries are asset for the entire world.
सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः। (5/5)— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 28, 2021
याविषयी ट्विट करत मांडविया म्हणाले, “कोरबीव्हॅक्स लस ही कोविड १९ विरुद्ध भारतातील पहिली स्वदेशी विकसित आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे, जी हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ई कंपनीने बनवली आहे.”