नवी दिल्ली – संपूर्ण जग करोना ( corona ) लसीची ( corona vaccine ) प्राण कंठाशी आणून वाट पाहत असताना भारतीयांसाठी एक गुड न्यूज आहे. भारतात चालू महिन्यातच अर्थात डिसेंबर अखेर किंवा फारतर पुढच्या महिन्याच्या सुरूवातीला लसीच्या ( corona vaccine update ) आपत्कालीन वापराला परवानगी दिली जाण्याची शक्यता असल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया ( randeep guleria ) यांनी म्हटले आहे.
आपल्याकडे काही लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत ( corona vaccine update ) व त्यांना आपत्कालीन स्थितीत सार्वजनिक स्तरावर वापरण्यासाठी मंजूरी दिली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका माध्यमाशी बोलताना गुलेरिया ( randeep guleria ) म्हणाले की, एकदा बुस्टर डोस दिला की लस विषाणूशी लढण्यासाठी पर्याप्त प्रमाणात अँटीबॉडी तयार करण्यास सक्षम आहे. त्यामुळे नागरिक काही काळासाठी सुरक्षित राहतील. मात्र लस मानवी शरिरात कोणत्या प्रकारे प्रतिकारक क्षमता विकसित करेल हे पाहण्याचे काम अद्याप राहीले असल्याचे त्यांनी नमूद केले.
लसीच्या सुरक्षिततेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. गुलेरिया म्हणाले की आता आपल्याकडे उपलब्ध माहितीच्या आधारे लस सुरक्षित असल्याचे सांगता येउ शकते. लसीची सुरक्षा आणि क्षमता याबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. आतापर्यंत 70 ते 80 हजार स्वयंसेवकांना लस देण्यात आली असून कोणावरही त्याचे गंभीर परिणाम झाल्याचे आढळून आलेले नाही. शॉर्ट टर्म अर्थात अल्पकालीन लस अधिक सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला.
ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या लसीबाबत चेन्नईतील एका स्वयंसेवकाने दाव्यासंदर्भात बोलताना गुलेरिया म्हणाले की, आम्ही अनेक वेळा मोठ्या समूहावर चाचणी करतो. अशा वेळी एखाद्या व्यक्तीला अगोदरच कोणता आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याचा लसीशी काही संबंध असत नाही.
चेन्नईतील एका व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार सीरमकडून विकसित केल्या जात असलेल्या लसीनंतर त्याला गंभीर साइड इफेक्ट जाणवत असल्याचे त्याने म्हटले आहे. अर्थात सीरमकडून याचा इन्कारही करण्यात आलेला आहे.