मुंबई – करोनाची लागण झाली आहे का? याबद्दल माहिती देणारी महत्वाची चाचणी म्हणजे आरटीपीसीआर चाचणी. या चाचणीचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसवणारे होते. मात्र आता या चाचणीचे दर कमी झाले आहेत. शासनाने एक परिपत्रक काढत या नव्या दरांची घोषणा केली आहे.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातल्या औद्योगिक औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. तसेच परिवहन व्यवस्थाही सुरू झाली आहे.
तपासणीसाठी आवश्यक रिएजंट्स, व्हीटीएम कीट्स, पीपीई कीट्स, आरएनए एक्स्ट्रॅक्शन कीट हे माफक दरात उपलब्ध झाले असून एन 95 मास्कचे कमाल दर 14 ते 49 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहेत.