जामखेडमधील शासकीय कार्यालयांना कोरोनाचा वेढा

तहसील कार्यालयातील तिघांसह ३२ कोरोनाबाधित

जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड शहरात कोरोनाने आपला विस्तार चांगलाच वाढवला असून पंचायत समिती,पोलीस स्टेशन पाठोपाठ कोरोनाला गेल्या तीन ते चार महिन्यापासून लढा देणाऱ्या तहसील कार्यालयात कोरोनाने जोरदार एंट्री केली असून आज तहसील कार्यालयातील महसूल विभागातील ३ जणांसह तालुक्यातील ३२ जण कोरोनाबाधित आढळून असून आज कोरोनामुळे १ जणांचा मुत्यू झाल्याने जामखेड मधील परिस्थितीत चिंतादायक झाली आहे.

जामखेड शहरासह तालुक्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येने उचांक गाठला असून त्यामुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. आरोळे हॉस्पिटल मध्ये होत असलेल्या रॅपिड अँटिजेन तपासणी अंर्तगत उघड होत असलेल्या संख्येने तालुक्याची परिस्थिती चिंतादायक झाली आहे. आतापर्यंत कोरोनाने पंचायत समिती पाठोपाठ जामखेड पोलीस स्टेशन,आरोग्य विभाग यासह आता जामखेड तहसील कार्यालयात एंट्री केली आहे.

दोन मंडळाधिकाऱ्यासह एका तलाठी कोरोनाबाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यातच एका ५४ वर्षीय कोतवालाचा कोरोनामुळे रात्री मृत्यू झाला असून आता पर्यंत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज सर्वाधिक कोरोनाचे ३२ रुग्ण आढळले असून यामध्ये शहरातील सदाफुले वस्ती १,कोर्ट रोड २,शिक्षक कॉलनी ५,जामखेड २,तपनेश्वर गल्ली १,मोरे वस्ती १ यासह ग्रामीण भागातील खर्डा ५,पिंपळगाव आवळा ५,साकत ६,जवळा १,खडकत १,जवळका १,खूरदैठण १, असे आज ३२ जण कोरोनाबाधित निघाले आहेत एकूण संख्या २६० च्या वर गेली आहे.

जवळ्यात आलेल्या व्यक्तीचा गावात संपर्क नाही…

आज झालेल्या तपासणीत जवळा गावाचा पत्ता असणाऱ्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे मात्र सदरील व्यक्ती बाहेर गावावरून जवळा गावात प्रवेश करण्याआधीच तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोळे हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेण्यात आले आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.