आळेफाटा (पुणे) – महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सेवा विभाग 1811 प्राथमिक आरोग्य केंद्र,10580 उपकेंद्र आणि 37 आश्रम शाळा मार्फत ग्रामीण भागात विविध आरोग्य सेवा मोफत पुरवीत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच आरोग्य केंद्र कोरोनाच्या महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी अँटिजेन टेस्ट, RTPCR टेस्ट,लसीकरण अत्यावश्यक आहे त्यानुसार ह्या टेस्ट करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगिकरण करून उपचार केले जातात.
परन्तु जुन्नर तालुक्यात जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट किट च जवळपास 8 ते 10 दिवसांपासून अभाव आहे.त्यामुळे तपासणी साठी आलेल्या सर्वच नागरिकांची गैरसोय होतोनाचे चित्र पहावयास मिळत आहे.
जे संशयित कोरोना रुग्ण आहेत ज्यांना कोरोनासदृश लक्षणामुळे अत्याधिक त्रास होत आहे अशाच लोकांची RTPCR टेस्ट केली जाते.RTPCR टेस्ट च अहवाल ( रिपोर्ट) येण्यासाठी 3 दिवस लागतात.तोपर्यंत सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण इतर नागरिकांच्या संपर्कात आल्यास इतरांना ही कोरोना ची लागण होण्याची शक्यता असते.दिवसभरात जास्तीत जास्त 10 ते 15 च रुग्णांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत केल्या जातात.
कोणत्याही प्रकारची लक्षण नसलेली परंतु पॉझिटिव्ह असणारे रुग्ण अँटीजेन टेस्ट अभावी इतर लोकांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना रुग्ण वाढीचा धोका वाढलेला आहे.
जिल्हाअंतर्गत,जिल्हा बाहेर अत्यावश्यक प्रवासासाठी ई पास काढण्यासाठी तपासणी अहवाल आवश्यक आहे परंतु येथे तपासणी किट च उपलब्ध नाही त्यामुळे परवानगी घेणार कशी ? असा यक्षप्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
खाजगी लॅबोरेटरी मध्ये अँटिजेन टेस्ट साठी जवळपास 300 रु ते 600 रु चार्जेस आकारले जातात तर RTPCR टेस्ट साठी 800 रु ते 1200 रु आकारले जातात.यामुळे नागरिकांच्या खिशाला नाहक भुर्दंड पडत आहे.ह्या सर्व टेस्ट सरकारी दवाखान्यात,प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत दिल्या जातात.परंतु सदर टेस्ट किट चा प्रशासनामार्फत नक्की कृत्रिम अभाव केला जात आहे का ?? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
1 मे पासून 18 वर्षाच्या पुढील सर्वच नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार असल्याची घोषणा सरकारने केली.परंतु COWIN, आरोग्य सेतू APP वर रजिस्ट्रेशन करायला गेले असता रजिस्ट्रेशन होत नाही.शिवाय आरोग्य केंद्राशी सम्पर्क साधला असता काही ठिकाणी प्रायोजिक तत्वावर 18 वर्ष पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले त्यामुळे सर्वच नागरीकामध्ये 18 वर्ष पुढील लसीकरणसंदर्भात संभ्रम अवस्था बघावयास मिळत आहे.यासंदर्भात आरोग्य विभागाच्या कोरोना निवारणाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता त्यावर किती ही प्रयत्न केले तरी संपर्क होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
अँटीजन टेस्ट किट अभावी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ विभागाच्या ढिसाळ ,अकार्यक्षम नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.तरी यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी अपेक्षा सर्वच नागरिकांमधून होत आहे.
सर्वच लॅब शासनाने ठरवून दिलेल्या दरात टेस्ट फी आकारणी करत आहेत ज्या खासगी लॅबमध्ये नियमबाह्य वाजवी दर आकारणी होत असेल तर थेट संपर्क करा. शिवाय अँटीजन टेस्ट किट 2 ते 3 दिवसांत किट उपलब्ध होतील.
– अतुल बेनके, आमदार, जुन्नर