मुंबईत 86.64 टक्के नागरिकांमध्ये करोना अँटीबॉडीज

मुंबई – मुंबई माहापालिकेने केलेल्या पाचव्या सेरो सर्व्हेमध्ये 86.64 टक्के नागरिकांच्या रक्तामध्ये करोना अँटीबॉडीज असल्याचे आढळून आले आहे. मार्च महिन्यात घेतलेल्या सर्व्हेपेक्षा हे प्रमाण खूपच अधिक आहे. त्यावेळी 36.3 टक्के नागरिकांमध्ये करोना अँटीबॉडीज असल्याचे आढळले होते.

अलीकेच झालेल्या सर्वेक्षणासाठी आठ हजार 674 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात झोपडपट्टीत 87.02 टक्के तर बिगर झोपडपट्टी क्षेत्रात 86.22 टक्के नागरिकांमध्ये ऍटीबॉडीज असल्याचे आढळून आले. मार्च महिन्यात घेतलेल्या सेरो सर्व्हेमध्ये झोपडपट्टीत 41. 6 टक्के नागरिकांना तर झोपडपट्टीनाह्यक्षेत्रात 28.5 टक्के नागरिकांमध्ये करोना अँटीबॉडीज आढळल्या होत्या. त्यामुळे शहरात या सेरो सर्व्हेमध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक निकाल मिळाल्याचे महापालिकेने निवेदनात म्हटले आहे.

हा सेरो सर्व्हे 12 ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या काळात घेण्यात आला. या सर्व्हेमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणातील नागरिकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्याने सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्‍यता वाढली असल्याचे महापालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अंशत: आणि पूर्ण डोस घेतलेल्यांमध्ये ऍटीबॉडीज आढळण्याचे प्रमाण 90.26 टक्के होते. तर लस न घेणाऱ्यांमध्ये हे प्रमाण 79.86 टक्के होते.

अपेक्षित परिणाम
आम्हाला आपेक्षित असणारे निकाल या सेरो सर्व्हेमध्ये आढळून आले आहेत. आम्हाला लसीकरण झअलेल्या नागरिकांचाही समावेश या सर्वेक्षणात करायचा होता, असे पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.