करोनाचा सुप्रीम कोर्टालाही फटका; ५० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

नवी दिल्ली : देशात करोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सर्वोच्च न्यायालयदेखील यातून सुटू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांच्या हवाल्याने याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली.

कर्मचारी करोनाबाधित असल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात येत आहे. अनेक खडंपीठ एक तास उशीरा सुनावणी घेणार आहेत. एका न्यायाधीशाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, माझे अनेक कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. काही न्यायाधीशांनाही करोनाची लागण झाली होती. पण त्यातून ते लवकर बरे झाले आहेत, असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी करोनाबाधित झाल्याचा परिणाम सुनावणीवरही झाला आहे. सकाळी १०.३० वाजता होणारी सुनावणी सर्व खंडपीठांकडून एक तास उशिराने सुरु होणार आहे. तर ११ वाजता होणारी सुनावणी १२ वाजता सुरु होईल अशी माहिती अतिरिक्त निबंधकांनी दिली आहे.

भारतात करोनाची दुसरी लाट आलेली असून गेल्या आठवड्यात १० लाखांच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत. फक्त रविवारी देशात दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळले. मृताची संख्याही वाढलेली असून रविवारी झालेल्या ८३९ मृत्यूसोबत मृतांची संख्या १ लाख ६९ हजार २७५ वर पोहोचली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.