न्हावरे(प्रतिनिधी) :-न्हावरे (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ महिला व पुरुष करोना मुक्त होऊन आज (दि.१२) न्हावरे येथील त्यांच्या घरी परतले आहेत.याबाबत शिरूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी माहिती दिली.
संबंधित ज्येष्ठ महिला व पुरुष मुंबई(अंधेरी)वरून न्हावरे(ता.शिरूर)येथे २० जूनला आले होते.बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन येथील श्री.मल्लिकार्जुन विद्यालयात क्वारंटाइन केले होते.
क्वारंटाइन दरम्यान ज्येष्ठ महिला व पुरुषामध्ये करोनाची काही लक्षणे आढळल्यामुळे त्यांची करोना चाचणी केली असता,२७ मे रोजी ज्येष्ठ महिला व पुरुषाचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औंध येथील शासकीय रुग्णालयात पाठवले होते.चौदा दिवसांच्या उपचारानंतर दोनही ज्येष्ठांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.त्यानंतर त्यांना आज (दि.१२)औंध येथील शासकीय रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.