एकूण बाधित ६०६ तर १०५ ॲक्टिव्ह
जुन्नर – जुन्नर तालुक्यात रविवारी (दि. १६) तब्बल चोवीस करोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्यामुळे तालुक्यातील बाधितांचा एकूण आकडा ६०६ झाला आहे. गेल्या आठवड्यात तात्पुरता घसरलेला बाधितांचा दर पुन्हा वेगाने वाढत असल्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक बनले आहे.
नव्याने मंगरूळ, अमरापूर व ओतूर गावात प्रत्येकी तीन रुग्ण आणि जुन्नर, नारायणगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, सावरगाव, मांजरवाडी व पाचघर या गावांमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर बारव, आळे व पिंपरी पेंढार येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. या ६०६ बाधितांपैकी ४७४ व्यक्ती उपचारानंतर घरी परतले आहेत तर उर्वरित १०५ ॲक्टिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.