पोर्ट ऑफ स्थेन – एक दिवसीय सामन्याच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या ख्रिस गेलला वेस्ट इंडिजच्या कसोटी संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी राहकीम कॉर्नवालला संधी मिळाली आहे. पहिल्या कसोटीस 22 ऑगस्टपासून नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) येथे प्रारंभ होणार आहे.
गेल हा लवकरच 40 व्या वर्षात पदार्पण करीत असून या मोसमात त्याचा खेळ अपेक्षेइतका झालेला नाही. त्याच्या जागी संघात स्थान मिळालेल्या कॉर्नवालने भारत “अ’ संघाविरूद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये सातत्य दाखविले आहे. त्याआधी तंदुरूस्तीच्या समस्येमुळे त्याला वरिष्ठ संघात स्थान मिळाले नव्हते. कॉर्नवाल हा ऑफस्पीन गोलंदाजी करतो व मधल्या फळीत फलंदाजी करतो. त्याने 2014 मध्ये प्रथम दर्चाच्या सामन्यांत पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 55 सामन्यांमध्ये 2 हजार 224 धावा केल्या असून 260 विकेट्स घेतल्या आहेत.
संघ – जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्राथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टोन चेस, राहकीम कॉर्नवाल, शेन डोवरीच (यष्टीरक्षक), शेनन गॅब्रियल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, किमो पॉल, केमार रोच.