आळंदी – शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय आणि आदित्य इंग्लिश स्कूल यांच्या नूतन इमारतीचे कोनशिला अनवारण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे डिजिटल युग आहे, आपल्या सर्वांना डिजिटल टेक्नाॅलाजीचे महत्व कळाले पाहिजे. ते ज्ञान आपण आत्मसात करून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. तसेच फार्मसी अभ्यासक्रमाचे महत्व आणि भविष्य काळातील वाटचाल यावरही त्यांनी भाष्य केले. त्याचबरोबर वाचनाचे महत्व, स्त्री-पुरूष समानता, महिला सबलीकरण व आत्मनिर्भरता या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे, खजिनदार मयूर ढमाले, प्रा. राजीव पाटील, प्राचार्य हंसराज थोरात, प्राचार्य प्रमोद इंगळे, मुख्याध्यापक अतुल पानसरे, भालचंद्र नलवडे, डाॅ. पांडुरंग मिसाळ यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.