पुणे- पुण्यात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने विलगीकरण कक्षाची उभारणी केली आहे. त्यात एखाद्या हॉटेल प्रमाणे करोना संशयितांना सुविधा असणार आहे.
बेड, लॉकर, टीव्ही या सगळ्या सुविधा संशयितांना पुरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 45 वर गेली आहे.
दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून सगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.