कोलकाता : देशभरात नागरिकता दुरुस्ती कायद्याचा (सीएए) विरोध होत आहे. जनता रस्त्यावर उतरून या विधेयकाचा विरोध करत आहे. जाधवपूर विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीने दीक्षान्त समारंभात पदवी घेत असताना सीएएची प्रत फाडून विरोध कायद्याला विरोध केला आहे.
It is these women who are revolutionizing India
After receiving the gold medal at the #JadavpurUniversity Convocation. #DebsSmitaChaudhary tore the Citizenship Law Amendment (CAA) on stage. #NRC_CAA_Protest @ComradeMallu pic.twitter.com/ea8pOs1Ng5— RINCE KURIAN (@rinse_kurian) December 24, 2019
या विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देबोस्मिता चौधरी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पदवी घेताना देबोस्मिता चौधरी म्हणाली, आम्ही कोणतेही कागदपत्रे सरकारला दाखवणार नाही. या प्रति फाडून मी फाडून विद्यापीठाचा अनादर करीत नाही. मला माझ्या संस्थेतून पदवी मिळवल्याचा अभिमान आहे. यावेळी कुलगुरू, कुलसचिव मंचावर उपस्थित होते.