कोपेनहेगन जगातील सर्वात सुरक्षित शहर

...तर पहिल्या पन्नास शहरांमध्ये मुंबई दिल्लीचा समावेश

लंडन – जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनचा सन्मान करण्यात आला आहे. पहिल्या सुरक्षित 50 शहरांच्या यादीमध्ये भारतातील मुंबई आणि

दिल्ली या शहरांचाही समावेश आहे. आतापर्यंत आघाडीवर असलेल्या टोकीयो आणि ओसाका या शहरांना मागे सारून कोपेनहेगन शहराने हा मान मिळवला आहे.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने याबाबत सर्वे केल्यानंतर हे निष्कर्ष जाहीर केले आहेत या युनिटने जगातील सर्वात सुरक्षित 60 शहरांची नावे जाहीर केली आहेत.

यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर कॅनडामधील टोरंटो आणि तिसर्‍या क्रमांकावर सिंगापूरचा समावेश करण्यात आला आहे. त्या पन्नास शहराचे यादीमध्ये मुंबई 48व्या आणि दिल्ली पन्नासाव्या नंबर वर आहे.

गेल्या वर्षी दिल्लीला बावन्नावा आणि मुंबईला 45 वा क्रमांक देण्यात आला होता. सुरक्षाविषयक एकूण 76 मापदंड लक्षात घेऊन या शहरांची यादी तयार करण्यात आली आहे.

डिजिटल सुरक्षा आरोग्य विषयक सुरक्षा पर्यावरण विषयक सुरक्षा अशा विविध निकषांचा त्यात समावेश होता.

इंटरनेटची उपलब्धता आणि झाडांची संख्या हे सुद्धा महत्त्वाचे निकष मानण्यात आले. 2017 आणि 2019 या वर्षामध्ये आघाडीचा क्रमांक मिळवलेल्या टोकियोला यावेळी पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.