Copa America 2024 (Uruguay vs Colombia, Semifinal) : कोपा अमेरिकेच्या उपांत्य फेरीनंतर उरुग्वेचे खेळाडू चाहत्यांशी भिडले. गुरुवारी, यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये उरुग्वेचा खेळाडू डार्विन न्युनेझ कोलंबियाची जर्सी घातलेल्या एका चाहत्याला मारहाण करताना दिसत आहे.
Uruguay players have entered the stands and a fight has broken out between fans and players pic.twitter.com/XRbte2ibiy
— FOX Soccer (@FOXSoccer) July 11, 2024
तणावयुक्त आणि चुरशीच्या झालेल्या अशा उपांत्यफेरीच्या सामन्यात कोलंबियाने 1-0 ने बाजी मारत सामना जिंकला. बुधवारी रात्री झालेल्या रोमांचक अशा उपांत्यफेरीच्या सामन्यात एकमेव गोल कोलंबियाच्या जेफरसन लेर्माने 39व्या मिनिटाला केला. यानंतर मात्र, उरुग्वेला पुनरागमन करता आले नाही आणि सामना गमवावा लागला. या सामन्यात डॅनियल मुनोजला लाल कार्ड दाखवण्यात आले होते, तर 7 खेळाडूंना पिवळे कार्ड देण्यात आले. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार धक्काबुक्की पाहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये डॅनियल मुनोझला बाहेर केल्यानंतर 10 खेळाडूंसह कोलंबियाची बचावफळी उरुग्वेच्या अथक हल्ल्यांसमोर ठामपणे उभे राहिली. यामध्ये गोलकीपर गिलेर्मो वर्गासने अनेक महत्त्वपूर्ण बचाव केले.
Histórico triunfo de Colombia 😎 pic.twitter.com/RDisM5Oc4l
— CONMEBOL Copa América™️ (@CopaAmerica) July 11, 2024
सामन्यानंतर उरुग्वेचे खेळाडू आणि चाहते यांच्यात संघर्ष…
सामन्यानंतर, डार्विन नुनेझ आणि डझनभर उरुग्वेच्या खेळाडूंनी चाहत्यांमधील भांडणात उडी घेतली. येथे नुनेज कोलंबियाची जर्सी घातलेल्या एका चाहत्याला मारहाण करताना दिसला. खूप प्रयत्नानंतर हे प्रकरण मिटले. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. हा पराभव उरुग्वेसाठी खूपच निराशाजनक आहे, कारण ते त्यांचे 16 वे कोपा अमेरिका जेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करत होते, जे एक विक्रम ठरले असते.
अंतिम फेरीत अर्जेंटिनाचे असणार आव्हान…
कोलंबियाच्या विजयाने त्यांची अपराजित मालिका सलग 28 सामन्यांपर्यंत पोहचली आहे, जे व्यवस्थापक कार्लोस क्विरोझ यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या लवचिकतेचा आणि सामरिक शिस्तीचा पुरावा आहे. यासह संघ तिसऱ्यांदा कोपा अमेरिका या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. कोलंबिया 23 वर्षांपूर्वी 2001 मध्ये शेवटचा अंतिम सामना खेळला होता आणि त्यांच्या घरच्या मैदानावर चॅम्पियन बनला होता. आता सोमवारी(15 जुलै, पहाटे 5.30 वाजता,भारतीय वेळेनुसार )अंतिम फेरीत त्यांचा सामना लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे. तर उरुग्वेचा संघ तिसऱ्या क्रमांकासाठी कॅनडाशी भिडणार आहे.