कोरेगावचा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

सातारा – शासकीय इमारतीच्या केलेल्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणारा बांधकाम विभागाचा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला. सुरेश आनंदा गायकवाड असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. तो सध्या बांधकाम उपविभाग कोरेगांव येथे नेमणुकीस आहे. त्याच्याविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत लाचलुचपतच्या सातारा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव तालुक्‍यातील देऊर येथील पशुवैद्यकीय दवाखानच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम माजी सैनिक मागासवर्गीय  मजूर सहकारी संस्थेने केले होते. त्या केलेल्या बांधकामाचे बिल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी गायकवाड याने तक्रारदाराला 25 हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर दोघाच्यांत झालेल्या तडजोडीनंतर गायकवाड हा दहा हजार रुपये स्विकारण्यास तयार झाल्यावर तक्रारदाराने याची माहिती एसीबीला दिली होती. मिळालेल्या माहितीची खात्री करून शुक्रवारी सापळा लावला होता. त्यावेळी गायकवाड हा एसीबीच्या पथकाला रंगेहात सापडला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरीफा मुल्ला व सापळा पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.