महाराष्ट्र बॅंक व लोन टॅपचा सहकार्य करार; लघु उद्योगांना सह – कर्ज देण्यासाठी एकत्रीत काम

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सह-कर्ज (को- लेंडिंग ) देण्यासाठी पुणे येथील लोन टॅप क्रेडीट प्रोडक्‍टस ह्या बिगर बॅंकिंग वित्तीय कंपनीसोबत सहकार्य करार केला आहे.

को-लेंडिंग अंतर्गत प्रारूपानुसार कर्जदाराच्या सोयीनुसार डिजिटल कर्ज माध्यामावरून कर्ज मंजूर करून घेण्याची सुविधा असून त्यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ग्राहकांचे प्राथमिक कर्ज प्रक्रीयेपासून ते कर्ज वितरण आणि संनियंत्रणा पर्यंत ऑन – बोर्डिंग होणार आहे. सदर सह – कर्ज प्रारूपानुसार बॅंकेचे उद्भासन ( एक्‍स्पोजर ) 80 % पर्यंत असून उर्वरित रक्कम लोन टॅपतर्फे देण्यात येईल.

आतापर्यत कर्जापासून वंचित असलेल्या व कमी कर्ज वितरण झालेल्या क्षेत्रांकडे कर्ज प्रवाह वाढविण्यासाठी व अंतिम लाभार्थ्याला परवडणाऱ्या किमतीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी बिगर वित्तीय बॅंकिंग कंपन्यांच्या समोर असलेल्या रोखतेच्या पेचप्रसंगावर उपाय योजना करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सह – कर्ज (को- लेंडिंग ) प्रणालीची सुरवात केली असल्याचे मत बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव यांनी व्यक्त केले.

सह – कर्ज (को- लेंडिंग )प्रारुपामुळे प्राधान्य क्षेत्राचे कर्ज वाटप उद्दिष्ट गाठण्यात बॅंकेला मदत होईल असे बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा यांनी सांगितले. ह्या प्रारुपाचा सर्वांनाच लाभ होईल – विशेषतः बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांना ग्राहकांच्या व्यापक अभिगम मिळेल व कमी व्याजदराने बॅंकांकडून कर्ज मिळून ग्राहकांना अधिक लाभ होईल असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.