विद्यार्थ्यांशी वार्तालापाने आचारसंहितेचा भंग नाही

तामिळनाडूत निवडणूक अधिकाऱ्यांकडून राहुल गांधींना दिलासा

चेन्नई – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी केलेल्या वार्तालापामुळे आचारसंहितेचा भंग झाला नाही. असा निर्वाळा तामिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रत साहू यांनी दिला आहे. तामिळनाडूतील स्टेला मॅरिस महिला महाविद्यालयामध्ये 13 मार्च रोजी झालेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमासाठी परवानगीच्या अटींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करण्यात आलेले नाही, असे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यावर साहू यांनी हा निर्वाळा दिला आहे.

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती, असे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कळवले होते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही. मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचा तपशील मागवण्यात आला असून त्या भाषणाच्या गोषवाराचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे.

तत्पूर्वी आचार संहिता लागू असताना महाविद्यालयाकडून राहुल गांधी यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम कसा आयोजित केला गेला, याची चौकशी करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले होते. या वार्तालापादरम्यान राहुल गांधी यांनी महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 33 टक्के आरक्षणाचे आश्‍वासन दिले होते. याशिवाय राफेल खरेदी गैरव्यवहारासारखे काही मुद्देही त्यांनी उपस्थित केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)