हाय अलर्टमुळे अधिवेशनाचे कामकाज चौथ्या दिवशीच गुंडाळले

– सीमेवरील धुमसत्या संघर्षाचे अधिवेशनावर पडसाद

मुंबई –देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन चौथ्या दिवशीच गुंडाळले आहे. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार मुंबईत विधानभवन परिसरात असतात.यामुळे सुरक्षेवर अतिरिक्त ताण येतो. याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. सर्वांशी चर्चा करुन अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेतला गेला.

दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा बदला घेताना मंगळवारी भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा तळ उद्‌ध्वस्त केला होता. तर पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केली व भारताचे एक विमान पडल्याने सीमेवरील संघर्ष चिघळला आहे. यामुळे देशातील प्रमुख शहरात व विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला असून लष्कर व तटरक्षक दलाबरोबरच पोलिसांवरही सर्व प्रमुख ठिकाणांच्या बंदोबस्ताची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधीमंडळाचं अधिवेशन चौथ्या दिवशीच गुंडाळले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)