कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शाहू समाधी’प्रश्नी बोलावलेल्या बैठकीत वादावादी

ताराराणी सभागृहात गदारोळ : जिल्हाधिकारी आणि महापौरांसमोर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार

कोल्हापूर- कोल्हापुरातल्या नर्सरी बागेत उभारल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी  जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बोलावण्यात आलेल्या व्यापक बैठकीत मोठी वादावादी होऊन  गोंधळ झाला. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. याप्रश्नी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह कोल्हापुरातील शाहू भक्तांचे शिष्टमंडळ यांच्यासोबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. परंतु दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मोठा गोंधळ झाला.

कोल्हापूरातील नर्सरी बाग इथं छत्रपती शाहु महाराजांच्या समाधी स्थळाचं काम सुरु आहे. या समाधी स्थळाचा एक भाग असणा-या प्रवेशव्दार उभारणीवरुन वाद निर्माण झालाय. हा वाद मिटविण्यासाठी आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत प्रेवशव्दार उभारणीवरुन वाद निर्माण होवुन जिल्हाधिकारी आणि महापौर  यांच्यासमोरच एक मेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा प्रकार घडला.

जवळपास दहा ते पंधरा मिनीटे हा वाद सुरु होता. यावेळी पोलीसांनी हस्तक्षेप करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आंदोलक आणि विरोधक एक मेकांवर धावुन जाण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी माईकचा ताबा घेत बैठक शांततेत पार पाडण्या संदर्भात अहवान केल. त्यानंतर ही बैठक सुरळीत पार पडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.