जबलपूर: मुस्लिम तरुन ऑर्डर घेऊन येणार म्हणून काल (बुधवारी) जबलपूर येथील अमित शुक्ला यांनी ऑर्डर कॅन्सल केली. आणि त्याने ट्विटरवर झोमॅटोला टॅग करत आपली नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर चांगलेच युद्ध रंगले होते.
सदर तरुणाला झोमॅटोने अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. तसेच कंपनीचे संस्थापक दिपेंद्र गोयल यांनीही ट्विटरवरून कंपनीची हीच अधिकृत भूमिका असल्याचे म्हटले.
दरम्यान, मुस्लिम तरुण डिलिव्हरी करणार म्हणून ऑर्डर कॅन्सल करणाऱ्या तरुणाला मध्य प्रदेश पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तसेच त्याला पोलिसांनी तुरुंगात पाठवण्याचा इशारा देखील दिला आहे.