Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय अग्रलेख

अग्रलेख : राज्यपालांची अतिशयोक्‍ती

by प्रभात वृत्तसेवा
August 1, 2022 | 6:00 am
A A
लोकांनी सावधानी न पाळल्यास कोरोना पुन्हा येईल – राज्यपालांचा इशारा

file pic

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या वादग्रस्त विधानांच्या मालिकेत दोन दिवसांपूर्वी आणखी एका विधानाची भर पडली. मुंबईमध्ये असलेल्या गुजराथी आणि मारवाडी समाजामुळेच मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे. गुजराथी आणि मारवाडी समाज जर मुंबईतून बाहेर पडला, तर मुंबईचा आर्थिक राजधानीचा दर्जा कायम राहणार नाही, अशा प्रकारचे विधान राज्यपालांनी केल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वादाचे ढग निर्माण झाले. सर्वच थरातील राजकीय नेत्यांकडून राज्यपालांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. 

राज्यपालांनी केलेले हे विधान म्हणजे अतिशयोक्‍ती अलंकाराचे उदाहरण मानावे लागेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजपचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एक प्रकारे, राज्यपालांचे वागणे नेहमीच अतिशयोक्‍ती असते याची कबुलीच त्यांनी दिली आहे. राज्यपालांची गेल्या दोन-अडीच वर्षांची कारकीर्द पाहता त्यांचे आतापर्यंतचे काम निश्‍चितच वादग्रस्त आणि पक्षपातीपणाचे मानावे लागते. राज्यपाल या पदाला घटनात्मक दर्जा असल्यामुळे या पदावरील व्यक्‍तीने कधीच कोणत्या पक्षाची बाजू न घेता काम करणे अपेक्षित असते; पण भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात राज्यपाल या पदावरील नियुक्‍ती नेहमीच राजकीय हेतूने केली जात असल्याने राज्यपाल नेहमीच सत्तेवर असलेल्या पक्षाच्या बाजूने राहिले आहेत. पण भगतसिंग कोश्‍यारी यांनी मात्र याबाबत अतिरेकी वर्तणूक विक्रमच प्रस्थापित केले आहेत.

भारतीय जनता पक्षामुळे त्यांना महाराष्ट्राचे राज्यपालपद मिळाले आहे त्याचे उपकार फेडण्याची एकही संधी राज्यपाल सोडत नाहीत. एकीकडे केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या उपकाराची परतफेड केली जात असतानाच दुसरीकडे वादग्रस्त विधानांची त्यांची मालिकाही सुरूच राहिली आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीबाबत त्यांनी जे विधान केले आहे ते या वादग्रस्त मालिकेतील पुढचा भाग मानावे लागते. एखादा राजकीय नेता किंवा राज्यपाल पदावरील व्यक्‍ती जेव्हा एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जातात तेव्हा तो कार्यक्रम ज्या समाजाचा असतो त्या समाजाचे कौतुक केले जाणे मान्य करण्यासारखे असले, तरी असे कौतुक करत असताना सीमा ओलांडणे मात्र चुकीचे ठरू शकते. गुजराथी समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी या समाजाचे कौतुक करत असताना महाराष्ट्रातील मराठी जनतेला मात्र कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ गुजराथी आणि मारवाडी यामुळेच जर मुंबईला देशाची आर्थिक राजधानी हा दर्जा मिळाला असेल, तर ज्या गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये गुजराथी आणि मारवाडी यांची संख्या जास्त आहे त्या राज्यांमध्ये मुंबईसारखे एखादे आर्थिक महानगर का निर्माण होऊ शकले नाही, या प्रश्‍नाचे उत्तरही यानिमित्ताने राज्यपालांना द्यावे लागेल. मुंबई हे एक मेट्रोपॉलिटन शहर आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक येथे पोट भरण्यासाठी येत असतात. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याने या महानगराचे आर्थिक राजधानी हे स्वरूप घडवण्यात अर्थातच महाराष्ट्रीय लोकांचा जास्त वाटा असणार, हे उघड आहे. या सर्व वास्तव स्थितीकडे दुर्लक्ष करून राज्यपालांनी केवळ विशिष्ट समाजाला व्यासपीठावरून खूश करण्याच्या उद्देशाने जी विधाने केली आहेत त्यामुळे ते निश्‍चितच अडचणीत आले आहेत. राज्यपाल पदावरील व्यक्‍तीने नेहमीच बोलताना संयम बाळगायला हवा; पण ही गोष्ट राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या बाबतीत कधीच घडलेली नाही. गेल्या अडीच वर्षातील त्यांच्या कारकिर्दीतील वादग्रस्त घटनांवर नजर टाकली तर नेहमीच अशाप्रकारचे वादग्रस्त विधाने करून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या बाबतीत गुरू-शिष्याचे विधान करून काही दिवसांपूर्वी त्यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही असेच एक वादग्रस्त विधान केले होते.

अभिनेत्री कंगना राणावतने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने तिच्या घरावर हातोडा मारला होता. त्या कंगना राणावतला राजभवनावर निमंत्रण देऊन कोश्‍यारी यांनी अजून एक वाद ओढवून घेतला होता. साधारण तीन वर्षांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार शपथविधी घेत होते तेव्हासुद्धा शपथविधीतील प्रोटोकॉलच्या निमित्ताने त्यांनी अनेक मंत्र्यांना व्यासपीठावरच सुनावले होते. राज्यपाल म्हणून त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्याबाबतही त्यांनी नेहमीच पक्षपातीपणा दाखवला आहे. उद्धव ठाकरे सरकारने जी बारा नावे विधानपरिषद सदस्य नियुक्‍तीसाठी पाठवली होती त्या नावांवर त्यांनी कधीही निर्णय घेतला नाही. शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी ज्या तत्परतेने एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले तेव्हाही त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्‍त करण्यात आला होता; पण आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत असे वादग्रस्त विधान करून त्यांनी अतिशयोक्‍तीचे टोक गाठले आहे, असेच म्हणावे लागते.

साहजिकच नजीकच्या कालावधीमध्ये जर केंद्रातील सरकारने त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची भूमिका घेतली, तर आश्‍चर्य वाटायला नको. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार स्थापन झाले असल्याने आता राज्यपालांच्या पातळीवरील कोणतेही वाद महाराष्ट्रातील सरकारला आणि केंद्रातील मोदी सरकारलाही नको आहेत. सध्याची परिस्थिती बघता निश्‍चितच राज्यपालांची गच्छंती अटळ दिसते. त्यांच्या महाराष्ट्रातील कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आता शिंदे आणि फडणवीस सरकारला आगामी अडीच वर्षे जर व्यवस्थित कारभार पूर्ण करायचा असेल, तर आता एखादा समंजस राजकीय नेताच राज्यपाल पदावर विराजमान होणे गरजेचे आहे. राज्यपाल पदावरील व्यक्‍तीने केलेले हे अतिशयोक्‍ती कारभार महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्याला निश्‍चितच परवडणारे नाहीत. त्यामुळे आता राज्यातील भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना बदलण्यात यावे, अशी मागणी करावी.

Tags: Controversial statementseditorial page articleMaharashtra Governor Bhagat Singh Koshyari

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : संविधानाचे सर्वोच्चपण
Top News

अग्रलेख : संविधानाचे सर्वोच्चपण

1 day ago
अर्थकारण : रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण?
Top News

अर्थकारण : रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण?

2 days ago
विशेष : राष्ट्रप्रेमाची मशाल जागृत करा!
Top News

विशेष : राष्ट्रप्रेमाची मशाल जागृत करा!

2 days ago
निसर्गगाणे : तेजाचे पूजन
संपादकीय

निसर्गगाणे : तेजाचे पूजन

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; ‘या’ शाळेची सध्या संपूर्ण देशात चर्चा

Womens U19 T20 WorldCup | भारतीय महिलांचा विजयरथ फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Most Popular Today

Tags: Controversial statementseditorial page articleMaharashtra Governor Bhagat Singh Koshyari

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!