अभिनेत्री पायल रोहतगीला वादग्रस्त वक्‍तव्य भोवले

बॉलिवुड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडल पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी रविवारी सकाळी अहमदाबाद येथून ताब्यात घेतले आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबत खुद्‌द पायलनेच ट्‌वीट करत दुजोरा दिला आहे.
पायलने पीएम ऑफिस आणि गृह मंत्रालयाला टॅग करत ट्‌वीट करत म्हणाली, “मोतीलाल नेहरू यांच्यावर बनविलेल्या व्हिडिओप्रकरणी राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. ज्याबाबत मी गूगलवरून माहिती घेतली होती. मला वाटते की, भाषण स्वतंत्रता एक विनोद बनला आहे.’

दरम्यान, एसपी ममता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल रोहतगी हिच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडिल मोतीलाल नेहरू यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याने पायलवर आयटी ऍक्‍ट कलम 66 आणि 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.