सोलापूर: संपूर्ण देशभरामध्ये सुधारित भारतीय नागरिकत्व कायदा तसेच मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त कुठे आहे, असा सवाल करत आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या टीका केल्याच्या निषेधार्थ सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चार हुतात्मा पुतळा येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला “जोडे मारो’ आंदोलन केले. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.