कोरोनाच्या रुग्णास उपचार न करता गोळ्या घालण्याचे आदेश
नवी दिल्ली : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे कोरोना व्हायसर आहे. अर्थात उत्तर कोरियामध्ये कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी त्यांनी एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. ‘इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस उत्तर कोरियामध्ये पसरु नये यासाठी कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपाचार करण्याआधी त्याला थेट गोळ्या झाडण्याचे आदेश किम जोंग यांनी दिले आहेत. त्यांच्या या निर्णयाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे.
उत्तर कोरियातील एक व्यावसायिक कामानिमित्त चीनमध्ये गेला होता. तेथे त्याला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले होते. चीनमधून परतल्यानंतर या व्यक्तीकडून इतर नागरिकांना धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्या व्यावसायिकाला गोळ्या घालण्याचे आदेश किम जोंग यांनी दिले. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी इतर यंत्रणा सज्ज असल्याचेही उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत तीन हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर 86 हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या माहितीनुसार हुबेई प्रांतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. वुहान प्रांतात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.