जालना – रस्त्याचं काम करताना कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. काही ठिकाणी कमी मुरूम, मुरूम न टाकता माती टाकणे, डांबर कमी वापरले, खडी कमी वापरणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी तुम्ही याआधी पाहिल्या असतील.. मात्र जालना जिल्ह्यातील एका रस्त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्या कंत्राटदाराला चांगलच फैलवार घेत आहेत.
व्हिडीओ मध्ये दिसत आहेत की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्जत-हस्तपोखरी या ठिकाणी एका कंत्राटदाराने रस्त्यावर चक्क कारपेट आंधरून त्यावर डांबर टाकून रस्ता तयार केला. तर काही नागरिक तो रस्ता हाताने उचलून गुंडाळत असल्याचे दिसत आहे.
संबंधित कंत्राटदाराने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं काम केलं आहे. हा रस्त्या तयार करण्यासाठी जर्मन तंत्रज्ञान वापरले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी हा जर्मन तंत्रज्ञानाने तयार केलेला रस्ता चक्क हाताने उचलून बाजूला केला आहे. दरम्यान आता संबंधित कंत्राटदारावर नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://www.facebook.com/reel/1688676178270874