नवी दिल्ली – सध्या समाज माध्यमावर नागरिक परस्परांविरोधात अरेरावी करीत तिरस्कार निर्माण करणारी वक्तव्य करीत आहेत. भारतीयांसाठी सध्याचे वर्ष आव्हानात्मक आहे. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CBr_rVcnTVx/?utm_source=ig_web_copy_link
टाटा यांनी इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखाद्या विषयावर चटकन निर्णय घेऊन आपलाच निर्णय बरोबर आहे आणि दुसऱ्याचा निर्णय चुकीचा आहे अशा प्रकारची वक्तव्य अयोग्य भाषा वापरून केली जातात. एकमेकांना मानसिक त्रास न देता, एकमेकाचे पाय न सोडता एकमेकांना मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. संवेदनशीलतेने विचार करण्याची आवश्यकता वाढली आहे.