लोहारा : लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ कन्टेनर व कार चा शुक्रवारी दुपारी पावने तीनच्या सुमारास भिषण आपघात झाला यात चालकासह एक महीला व तीच्या दोन लहान मुली जागीच ठार झाल्या आहेत. तर यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना सोलापुर तर तिघांना उस्मानाबादला पुढील उपचारासाठी हालविण्यात आले आहे. पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आपल्या गावी माकणीला येत असतानाच काळाने घाला घातला.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील नारायण साठे व सतिश पवार हे कामानिमित्त पुण्यातच वास्तव्यास होते. कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. विषाणूबाधीत रूग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नोकरी व कमानिमित्त पुणे, मुंबईसह इतर शहरात गेलेले लोहारा तालुक्यातील नागरिक आपआपल्या गावांकडे परतू लागली आहेत.
नारायण साठे आपल्या कुटूंबासह व सतिश पवार यांचे कुटूबिय ही एकाच कारने पुण्याहुन शुक्रवारी गावी माकणीकडे जात असताना खेड पाटी जवळ माकणीहुन येणाऱ्या कन्टेनरची (एम.एच.१३ आर १२८७) व कारची (एम.एच. १२ पीएच ६३२६) जोराची धडक बसली यात चालक नेताजी मनोहर मोरे (वय २८) यांच्यासह मनिषा नारायण साठे (वय ३२),वैष्णवी नारायण साठे (वय १२),वैभवी नारायण साठे (वय ८) हे चार जण जागीच ठार झाले आहेत.
नारायण हरीदास साठे (वय ३६) व त्यांचा मुलगा हरीश नारायण साठे (वय २) हे गंभीर जखमी झाले आहेत. यांना पुढील उपचारासाठी सोलापुरला हालविण्यात आले आहे. तर शितल सतिश पवार (वय ३०), सांस्कृती सतिश पवार (वय ६),वेदांत सतिश पवार (वय ३) हे ही गंभीर जखमी झाले असून यांना ही पुढील उपचारासाठी उस्मानाबादला हालविण्यात आले आहे.