10 लाख जणांचा “कॉन्टॅक्ट’ ट्रेस

शहरातील तब्बल 9 लाख 88 हजार 244 जणांची माहिती जमा

पुणे – शहरात गेल्या पाच महिन्यांत करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 9 लाख 88 हजार 244 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले आहे. तर आतापर्यंत शहरात सुमारे 4 लाख 20 हजार 548 चाचण्या करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

विशेष म्हणजे, पुणे शहरातील चाचण्यांचे प्रमाण हे देशात सर्वाधिक असून पुण्यात प्रती दहा लाख व्यक्तींमागे सुमारे 94 हजार 935 चाचण्या करण्यात आल्या.

करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ट्रेसिंग केले जात असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. हे काम 24 तास वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून सुरू असते. शहरात 26 ऑगस्टअखेर सुमारे 87 हजार 317 रुग्ण सापडले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आतापर्यंत पालिका प्रशासनाकडून सुमारे 9 लाख 88 हजार 244 जणांचे ट्रेसिंग करण्यात आले.

बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय तसेच जवळून संपर्क असलेल्या या व्यक्ती असून त्यातील लक्षणे असलेल्या रुग्णांची तसेच बाधितांशी थेट संपर्क आलेल्या व्यक्तींची तातडीने प्रशासनाकडून रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट केली जात आहे. तर, उर्वरीत संशयितांना लक्षणे दिसल्यानंतर चाचणीसाठी बोलवले जात आहे.

पालिकेने केलेल्या या ट्रेसिंगनुसार, सुमारे 2 लाख 84 हजार 617 संशयित अति जोखीम गटातील असून 7 लाख 3 हजार 627 जण कमी जोखीम असलेले संशयित आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.