कॉम्प्युटर व्हायरसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

सीबीआयकडून छापासत्र; 6 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली – ‘आपल्या कॉम्प्युटरमध्ये तांत्रिक दोष आहे.’ असा मेसेज कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ‘पॉप अप’ होत असेल. तर तो धोका समजावा. कारण त्या मेसेजनुसार ऍन्टीव्हायरस इन्स्टॉल करण्याच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करणारे एक रॅकेट सीबीआयने उघड केले असून सहा खासगी कंपन्यांवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी दिल्लीस्थित सॉफ्टविल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि सबुरी टीएलसी वर्ल्डवाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, जयपूर स्थित इनोव्हाना थिंकलेब लिमिटेड आणि सिस्टवेक सॉफ्टवेयर प्रायव्हेट लिमिटेड, नोएडा स्थित बेनोवेलिएंट टेक्‍नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यासह नोएडा आणि गुरुग्राम आधारित सबुरी ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या प्रांगणात सीबीआयने छापे घातले.

जयपूर, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद आणि मैनपुरीतील 10 ठिकाणांवर सीबीआयने छापे घातले.

लोकांच्या कॉम्प्युटरवर ‘पॉप अप’द्वारे व्हायरसचा मेसेज पाठवला जात असे. त्यावरच्या फोन नंबरवर ग्राहकांनी कॉल केल्यावर कॉल सेंटरवईल ऑपरेटर ठराविक ऍन्टीव्हायरस इन्स्टॉल करण्यास सांगत असत. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करण्यासही सांगितले जात असे.

त्यानंतर प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या व्हायरससाठी लोकांना पैसे मोजायला लावले जात असायचे, असे सीबीआयच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.