- इंडियन मेडिकल असोसिएशनची तयारी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील गृहविलगीकरणातील (होम क्वॉरंटाइन) रुग्णांवर उपचार करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनने तयारी दर्शविली आहे.
गृहविलगीकरणासाठी निर्देशित केल्यानंतर रुग्णास संबंधित डॉक्टरने सूचविलेल्या तपासण्या करून प्राप्त रिपोर्टनुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येईल. उपचार कालावधीत रुग्णामार्फत दररोज डॉक्टरांशी दूरध्वनीद्वारे कन्सल्टंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेसाठी प्रति रुग्ण दहा हजार रुपये डॉक्टर घेणार आहेत. रुग्णाला ते शुल्क द्यावे लागणार असून, ही सुविधा पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाची आहे.
शहरामधील करोनाबाधित झालेल्या गृह विलगीकरणामधील रुग्णांना खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामार्फत वैद्यकीय सल्ला तसेच उपचार पुरविण्याचे नियोजन करण्याबाबत महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधीसमवेत आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
त्यानुसार असोसिएशनने सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखेचे सदस्य असलेल्या डॉक्टरांचा व्हॅट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या डॉक्टरमार्फत तपासणी केली जाणार आहे. करोनाची बाधा झालेल्या रुग्णास 1 वेळा पॅनलवरील खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे.
त्यानुसार रुग्णास विलगीकरणाचा सल्ला अथवा रुग्णालयामध्ये दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच गृहविलगीकरणासाठी निर्देशित केल्यानंतर रुग्णास संबंधित डॉक्टरने सूचविलेल्या तपासण्या करून प्राप्त रिपोर्टनुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येईल.
उपचार कालावधीत रुग्णामार्फत दररोज डॉक्टरशी दूरध्वनीद्वारे कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेसाठी प्रति रुग्ण दहा हजार रुपये डॉक्टर घेणार आहेत. रुग्णाला ते शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी असोसिएशनमार्फत पॅनलवरील 45 वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी दिली आहे. गृहविलगीकरणासंबंधी रुग्णासाठी व काळजीवाहकासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. ही सुविधा पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाची असणार आहे.