जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतीचे प्रभाग रचनेचे काम सुरू

पुणे: जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील वर्षी होणाcर आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासनाने सुरू केली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत प्रभाग रचना निश्‍चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डिसेंबर 2020पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे 1400 ग्रामपंचायती आहे. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहे. संबधित गावच्या तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळपाहणी करून प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणुक आयोगाने दिल्या आहेत.

तर तहसिलदार यांनी 10 जानेवारी 2020 पर्यंत प्रभाग रचनेच्या प्रारूपला मान्यता देण्यात यावी. या प्रभाग रचनेसंदर्भात नागरिकांच्या काही हरकती असतील तर त्या नोंदविण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहे.

तालुकानिहाय प्रभाग रचना करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे हवेली मधील 55 ग्रामपंचायती, आंबेगामधील 30, बारामतीमधील 49 ग्रामपंचायती, भोरमधील 74, दौंडमधील 50, इंदापूरमधील 61, जुन्नरमधील 67, मावळमधील 57, मुळशीमधील 45 ग्रामपंचायती, पुरंदरमधील 66, खेडमधील 91, शिरूरमधील 73 ग्रामपंचायती आणि वेल्हेमधील 31 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.