अभियंत्यांना बांधकाम स्थळाला भेट देता यावी

 मुंबई क्रेडाईच्या महाराष्ट्र शाखेने निर्बंधाच्या काळात अभियंत्यांना आणि आरेखकांना यांना बांधकाम स्थळाला भेट देता यावी याकरिता परवानगी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात क्रेडाईने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठविले आहे. खासगी बसच्या माध्यमातून कामगारांना बांधकाम स्थळावर नेण्याची आणि परत आणण्याची परवानगी मिळावी असेही पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने आगामी पंधरवड्यामध्ये बांधकामाला परवानगी दिलेली आहे. मात्र काही तांत्रिक प्रश्न निर्माण झाले असल्याचे क्रेडाईने म्हटले आहे.

बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची परवानगी असली तरी कामगार स्वतःहून काम करू शकत नाही. त्यासाठी त्यांना अभियंत्याकडून आणि इतरांकडून मार्गदर्शनाची गरज असते. हे सर्व काम ऑनलाईन केले जाऊ शकत नाही. बांधकाम स्थळावर एखादा अपघात झाल्यानंतर त्यामुळे मोठे मनुष्य आणि जीवितहानी होते.

त्यामुळे अभियंते आणि सुपरवायझरला कामाच्या स्थळावर उपस्थित राहण्याची गरज आहे असे पत्रात म्हटले आहे. बांधकामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे सरकारला अपेक्षित आहे. मात्र ते शक्‍य नसते असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे खासगी बसमधून बाहेरून कामगार बांधकाम स्थळावर जाण्याची गरज आहे. आम्ही संसर्ग वाढणार नाही अशा पद्धतीने काम करू असे पत्रात आश्वासन देण्यात आले आहे. सरकार आमच्या मागणीवर विचार करेल, अशी आशा असल्याचे क्रेडाईने व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.