बांधकाम व्यवसायीकाच्या सर्वेअरवर फावड्याने वार

चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पुणे – शहरातील एका बांधकाम व्यवसायीकाच्या सर्वेअरवर फावड्याने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बालेवाडी येथे दोन दिवसांपुर्वी घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात नवनाथ पंढरीनाथ बालवडकर व त्याच्या 15 ते 16 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक्‍सझरबिया प्रा.लि. कंपनीत सर्वेअर म्हणून कार्यरत आहेत. ते कंपनीच्या मालकीच्या बालेवाडी येथील जागेत इतर सहकाऱ्यांसमवेत वास्तुशास्त्राचे नवग्रह व पावडर मीठ टाकण्यासाठी गेले होते. नवनाथ बालवडकर याने गैर कायद्याची मंडळी जमवत मला का देणार नसाल तर कुणालाही काम करु देणार नाही असा दम भरला.

यानंतर शिवीगाळ करुन फिर्यादीचे सहकारी नितीन गावशेते यांना मारहाण करुन निघुन गेले. दरम्यान फिर्यादी त्याची गाडी आणण्यासाठी गेले असता, त्यांना तेथे गाठत फावड्याचे दांडके डोक्‍यात घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.