नवी दिल्ली – देशातील 27 शहरांमध्ये सध्या 1058 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरू आहे. ही माहिती नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना दिली.
मयुरविहार ते त्रिलोकपुरी संजय लेक स्टेशन या दरम्यानच्या 289 मीटर्स मेट्रो मार्गाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की सध्या 18 देशांमध्ये 721 किमी मार्गावर मेट्रो धावत आहेत.
दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन तर्फे दिल्लीत चांगल्या प्रकारची सेवा नागरीकांना उपलब्ध करून दिली जात असल्याचे कौतुगोद्गारही पुरी यांनी काढले. दिल्ली मेट्रोच्या प्रवासाचा लाभ रोज 65 लाख प्रवासी घेतात. एनसीआर परिसरातील हजारो नागरीकांना या सेवेचा लाभ होतो.