संजय राठोडांना संपवण्याचे कटकारस्थान; भाजप नेत्याचा राजीनामा

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  यामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर त्यांना पाठिंबा देणारेही अनेक जण आहेत. असेच भाजपच्याच सरपंचाने राजीनामा देत संजय राठोड यांना पाठिंबा दिला आहे.

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील काळवटी तांडा येथील सरपंच कमल नाथराव यांनी राजीनामा दिला आहे. सोबतच त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 

तसेच, कमल नाथराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.

लोकनेते मुंडे साहेबांच्या निधनानंतर भाजप पक्षामधील नेते मंडळी हे वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व आणि बंजारा समाजातील उच्च पदस्थ नेते संजय राठोड यांना संपविण्याचे कटकारस्थान करत असल्याचे जाणवत असे, असा गंभीर आरोप कमल नाथराव यांनी भाजपवर केला आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.