नांदेड, हुबळीतील हिंदु नेत्यांच्या हत्या करण्याचा कट; आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली  – महाराष्ट्रातील नांदेड, कर्नाटकात हुबळी आणि बंगळुरू तसेच तेलंगणातील हैदराबादमध्ये हिंदु समाजाच्या महत्त्वाच्या नेत्यांची हत्या करण्याचा कट आखणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे. या हत्येतून सामाजिक सौहार्द धोक्‍यात आणून दहशत पसरवण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला होता, असे या आरोपपत्रात म्हटले आहे.

लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने आखलेल्या कटाशी हे आरोपपत्र संबंधित आहे. मुळचे बंगळुरूचे डॉ. सबील अहमद उर्फ मोटू डॉक्‍टर आणि हैदराबादचा असादुल्लाखान यांच्यासह 25 आरोपींविरोधात हे आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. लष्कर -ए -तोयबा आणि हरकत उल जिहादी यांच्या दहशतवाद्यांना हाताशी धरून हा कट पुर्णत्वास नेला जाणार होता. देशाविरोधात युध्द पुकारण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या हत्या करण्यासाठी त्यांनी शस्त्रेही जमवली होती.

डॉ. साबील अहमद हा दहशतवादी संघटना लष्कर- ए- तोयबा या संघटनेचा सभासद होता. ते दमण आणि सौदी अरेबियातील रियाध येथील आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी या हत्या घडवण्याचा कट रचला होता. नांदेड, हुबळी आणि बंगळुरूमध्ये हिंदु समाजाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या हत्या घडवण्याच्या कट रचण्यासाठी घेतलेल्या बैठकांत ते सक्रिय सहभागी झाले होते, असे एनआयएच्या तापसात आढळून आले आहे.

तरूणांचा एक गट बंगळुरूमधील महत्त्वाचे हिंदु नेते आणि पत्रकारांची हत्या करण्याचा कट रचत होता. या प्रकरणाचा तपास करताना एनआयएला डॉ. मोटू या गूढ व्यक्तीमत्व ताब्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तापसात या प्रकरणाची पाळेमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणापर्यंत पोहोचली असल्याचे आढळून आले. या तपासात सौदी अरेबियात स्थाईक असलेला डॉक्‍टर यात सहभागी असल्याचे आढळले. वेगवेगळ्या सांकेतीक पत्रात तपास यंत्रणांना हा डॉक्‍टर म्हणजे डॉ. मोटू असल्याचे आढळून आले.
इंग्लंडमध्ये ग्लासगो विमानतळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार काफील अहमद याचा भाऊ म्हणजे डॉ. साबील अहमद हाच मोटू असल्याचा दावा एनआयएने केला आहे. ग्लासगो हल्ल्याच्या प्रकरणात डॉ. साबील अहमदची चौकशी करण्यात आली त्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले.

ज्यावेळी डॉ. मोटू याची ओळख एनआयएने पटवली. त्याचे वृत्त दैनिकांमध्ये प्रसिध्द झाले. त्यावेळी हे वृत्त त्यांनी नकारले. मात्र एनआयएच्या आरोपपत्रात या कटात डॉ. साबील अहमद हाच महत्त्वाचा घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यासह 25 जणांवर हे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.