सामूहिक विम्याचा पालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

6 कुटुंबांना मिळाली 60 लाख रुपयांची मदत

पुणे  – महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सामूहिक अपघात विमा योजना पालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारी ठरत आहे. गेल्या वर्षभरात अपघातात मृत्युमुखी तसेच जखमी झालेल्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सुमारे 60 लाख रुपयांचा विमा निधी वितरीत केल्याची माहिती विभागप्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत सहलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे तीन ते चार जीवघेणे अपघात झाले. त्यानंतर, कामगार कल्याण विभागाने ही अपघात विमा योजना मागील दोन वर्षांपासून सुरू केली आहे. त्यात 2018-18 मध्ये पहिल्या वर्षी कर्मचाऱ्यांकडून प्रति कामगार 145 रुपये विमा शुल्क घेण्यात आले होते. सुमारे 18 हजार 511 कर्मचाऱ्यांनी हे शुल्क भरले होते. त्यासाठी सुमारे 26 लाख 82 हजार रुपयांचा विमा हप्ता महापालिकेकडून भरण्यात आला होता. या वर्षात सुमारे 6 कर्मचाऱ्याचे अपघात झाले. त्यात त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे 60 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर या वर्षीही प्रशासनाने कामगारांकडून प्रति कामगार 135 रुपये विमा शुल्कप्रमाणे सुमारे 24 लाख 67 हजार रुपये भरले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)