पुणे : खंडणीच्या गुन्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप असलेल्या
तिघांना सत्र न्यायालयाने जी.पी. आगरवाल यांनी दिलासा दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली पोलीस कोठडी रद्द केली. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिघांना जामीन मंजुर केला.
विशाल शिवाजी ढोरे (36), अस्लम मंजूर पठाण (24, दोघेही रा. मांजरी, हडपसर) आणि सिद्धार्थ महिंद्र डांगी (28, रा. उत्कर्ष सोसायटी, कात्रज) अशी त्या तिघांची नावे आहेत.
बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन रास्ता पेठेतील महागडी जागा आणि तब्बल दोन कोटींच्या खंडणीची मागितल्या प्रकरणात महिलेसह माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांच्यावर कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल आहे. महिला, जैन आणि जगताप यांना जामिनही मिळाला आहे. तर बऱ्हाटे अद्याप फरार असून, त्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप करत पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या पार्श्वभूमीवर तिघांच्या वतीने ऍड. दादासाहेब भोईटे, ऍड. शरद भोईटे आणि ऍड. रोहिणी लंघे यांनी सत्र न्यायालयात क्रिमिनिल रिव्हीजन दाखल केली होती. तिघांचा खंडणीच्या गुन्ह्याशी संबंध नसुन केवळ आरोपी बऱ्हाटे याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. हा गुन्हा जामिनास पात्र आहे.
आरोपिंना जामिन मिळणे हा त्यांच्या कायदेशीर अधिकार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली पोलीस कोठडी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी बेकादेशरी ठरवत रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तिघांना प्रथमवर्ग न्यायालयाने तिघांना जामिन मंजूर केला आहे.