पुणेकरांना दिलासा! शहरात 4 हजार 825 बाधितांना डिस्चार्ज; नवीन 2,025 पॉझिटिव्ह

पुणे – करोना बाधितांची संख्या कमी झाली असून, त्याच्या दुप्पट बरे झालेल्यांची संख्या असल्याचे दिवसभरातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. दिवसभरात 2 हजार 025 बाधितांची नोंद झाली, तर 4 हजार 825 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला.

बाधितांची संख्या आता कमी होण्याला आणि पॉझिटिव्हिटी दर कमी होण्याला सुरुवात झाली आहे. ही आनंदाचा गोष्ट असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मात्र अद्याप म्हणावे तितके कमी झालेले नाही. दिवसभरातील 2 हजार 025 बाधितांचा समावेश करून एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 46 हजार 564 झाली आहे, तर त्यातील 4 लाख 5 अह्जार 474 बरे झाले आहेत. बरे झालेल्यांचा आकडाही आता चार लाख पार गेला आहे.

बाधितांमधील सक्रिय बाधितांची संख्या 33 हजर 732 असून, त्यातील 1 हजार 401 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या 24 तासांत 74 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 24 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुण्यातील मृतांची संख्या आता 7 हजार 358 झाली आहे.

दिवसभरात 13 हजार 107 संशयितांची स्वॅब टेस्ट केली असून, आजपर्यंत 22 लाख 76 हजार 88 संशयितांच्या तपासण्या केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.