मुंबईकरांना दिलासा! करोना रूग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवली

मुंबई  – मुंबईत काल एका दिवसात करोनाचे एकूण 9108 रूग्ण आढळून आल्याने मुंबईतील करोना रूग्णांसाठीची बेड्‌सची संख्या वाढवण्यात आली आहे. शहरात आता आणखी तीन हजार बेड्‌स उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामुळे मुंबई महापालिकेत उपलब्ध असलेल्या एकूण बेड्‌सची संख्या आता 15 हजार 971 इतकी झाली आहे. त्यातील चार हजार 160 बेड्‌स सध्या रिक्त आहेत ही शनिवारी रात्रीची स्थिती होती अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की करोना रूग्णांना बेड्‌सची आवश्‍यकता असताना ते आपल्या सोयीच्या हॉस्पीटल मध्ये जागा निर्माण होण्याची वाट पहात असतात. त्यातून अनेक रूग्णांची तब्ब्येत आणखी बिघडते, त्यामुळे रूग्णांनी आपल्या सोयीच्या हॉस्पीटल मध्ये जागा निर्माण होण्याची वाट न पहाता जागा मिळेल तेथे रूग्णांनी दाखल व्हावे असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. मुंबईत सध्या कोविड उपचाराची 30 केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.