नवी दिल्ली – करोना व्हायरस संबंधी आज एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशभरातील करोना बाधितांची संख्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून समजत आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार नव्या करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ९१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसांपासून १६ हजार पेक्षा अधिक करोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, आज १२ हजार नव्या करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १२ हजार २८६ नव्या करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर सध्या १ लाख ६८ हजार ३५८ रुग्णावर उपचार सुरू असून ९१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच मागील २४ तासांत देशातील १२ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
India reports 12,286 new #COVID19 cases, 12,464 discharges and 91 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,11,24,527
Total discharges: 1,07,98,921
Death toll: 1,57,248
Active cases: 1,68,358Total Vaccination: 1,48,54,136 pic.twitter.com/ziRZ3NcFrR
— ANI (@ANI) March 2, 2021
दरम्यान, देशातील करोनाबाधितांची संख्या १ कोटी ११ लाख २४ हजार ५२७ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५७ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ७ लाख ९८ हजार ९२१ जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख ५४ हजार १३५ जणांनी करोनाची लस घेतली आहे.