मद्याच्या होम डिलिव्हरीचा किंवा ऑनलाईन विक्रीचा विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात मद्याच्या होम डिलिव्हरीचा किंवा ऑनलाईन विक्रीचा राज्यांनी विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले. अर्थात, कुठला आदेश देण्याचे टाळताना न्यायालयाने मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी होऊ नये या उद्देशातून राज्यांना तसे सुचवले.

लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री करण्याची परवानगी दुकानांना देण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 मे यादिवशी जारी केली. त्या मार्गदर्शक तत्वांना आव्हान देणारी याचिका न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीवेळी निकाली काढली.

देशभरात मद्यविक्रीची सुमारे 70 हजार दुकाने आहेत. त्या दुकानांमधून 5 कोटीपेक्षा अधिक ग्राहकांनी मद्याची खरेदी केली. त्या खरेदीवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला.

लॉकडाऊनच्या काळात किंवा देश करोनामुक्त होईपर्यंत मद्याची विक्री थेट संपर्कातून होऊ नये, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने करोना फैलाव रोखण्यासाठी मद्याची ऑनलाईन विक्री किंवा होम डिलिव्हरी करण्याबाबत विचार करण्यास सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.