आता पालिकेचीच लॅब उभारून स्वॅब टेस्टिंग मशीन खरेदीचा विचार

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

पुणे – स्वत:ची टेस्टिंग लॅब तयार करून टेस्टिंग मशीन खरेदी करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत असून, त्यामुळे जास्तीतजास्त स्वॅब टेस्टिंग करता येतील. यामुळे करोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊन करोनाची साखळी तोडता येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

महापालिकेने स्वत:ची टेस्टिंग लॅब तयार करावी याची मागणी गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांनीही केली आहे. रोजच्या रोज सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांची स्वॅब सॅम्पल्स घेतले जात आहेत. मात्र, तुलनेत टेस्टिंगची संख्या कमी आहे. तीन ठिकाणी या टेस्ट केल्या जातात. मात्र त्याला मर्यादा आहेत. याठिकाणी अन्य जिल्ह्यातूनही स्वॅब टेस्टिंगसाठी येतात. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रासाठी ही लॅब उपयुक्त असणार आहे.

 

महापालिकेच्या स्वत:च्या टेस्टिंग लॅबमध्ये दोन मशीन्स घेण्याचा विचार आहे. एका मशीनवर रोज सुमारे पाचशे ते सहाशे स्वॅब टेस्ट करता येतील. त्यामुळे त्याची मदत करोनाची साखळी तोडण्यासाठी आणि जास्तीतजास्त नागरिकांचे कमीतकमी वेळात टेस्टिंग होऊन अहवाल येतील, असे कुमार म्हणाले. यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागणार आहे. या विषयावर स्थायी समिती, महापौर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

 

सीओईपीतील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये उर्वरित 400 बेड्ससाठी नवी ऑर्डर पीएमआरडीए देणार असून पुढील आठ दिवसांत ते उपलब्ध होतील. त्यानंतर 15 दिवसांनी हे हॉस्पिटल 800 बेड्ससह पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. यासाठी आवश्यक प्रशिक्षण ससूनमधील तज्ज्ञ देत आहेत.

– विक्रम कुमार, आयुक्त, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.