परिणितीचे जाम पॅक्‍ड शेड्युल

परिणिती सध्या चार गोष्टींमध्ये खूप बिझी आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे ती दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होते आहे. त्यामुळे सामानाची हालवा हलव करण्यात तिला खूप वेळ द्यायला लागतो आहे. “जबरीया जोडी’ रिलीज होण्यासाठी फक्‍त 3 आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्याच्या प्रमोशनसाठीही वेळ द्यायचा आहे. त्याशिवाय “गर्ल ऑन द ट्रेन’चे शुटिंग सुरू होण्यासाठीही 3 आठवडेच शिल्लक राहिले आहेत.

याच दरम्यान साईना नेहवालच्या बायोपिकसाठी बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेणेही सुरूच आहे. शुटिंग सुरू होण्यापूर्वी तिला हे ट्रेनिंग संपवायचे आहे. “गर्ल ऑन द ट्रेन’ वर आधारित सिनेमाचे शुटिंग सुरू करून लगेच संपवण्याचीही परिणितीला घाई आहे. कारण या मधल्या काळातच तिला आपल्या घराचे शिफ्टींगही संपवायचे आहे. हे सगळे फक्‍त तीनच आठवड्यात तिला करायचे आहे.

त्यामुळे वेळेचे काटेकोर नियोजन करून तिने सर्व कामे पटापट संपवायचा धडाका लावला आहे. बिचारी धावपळ करून अगदी दमून जात असेल. सिद्धार्थ मल्होत्रा बरोबरचा तिचा “जबरीया जोडी’ 12 जुलै रोजी रिलीज होतो आहे. तर “गर्ल ऑन द ट्रेन’ या पॉला हॉकिन्स यांच्या कादंबरीवरीवर आधारित आगामी सिनेमाही पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.